" Swapni Roj Mee Tula "
स्वप्नी रोज मी तुला.........

तुला न सांगता तुला, गीतात माझ्या गुंफतो,
स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो

असेच रोज न्हाऊनी, लपेट ऊन कोवळे,
असेच चिंब केस तू, उन्हात सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी, हळुच येथे हुंगतो,
स्वप्नी रोज मी तुला, ....

अशीच रोज अंगणी, लवून वेच तू फूले,
असेच सांग लाजूनी, कळ्यांस गूज आपुले,
तुझ्या कळ्या, तुझे फूले, येथे टिपून काढतो,
स्वप्नी रोज मी तुला, .....

अजून तू अजाण ह्या, कुंवार कर्दळीपरी,
गडे विचार जाणत्या, जुईस एकदा तरी,
दुरुन कोण हा तुझा, मरंद रोज चाखतो,
स्वप्नी रोज मी तुला, .......

Singer : Suhas Pai
Counter